महापालिका कमिशनचा धंदा नाही, कोणी कितीही मोठा असला तरी….; मुख्यमंत्र्यांचा नवनिर्वाचित नगरसेवकांना इशारा

पुणे : राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाकडून निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा नाही. महापालिकेत कुठल्याही पद्धतीने उन्माद, पारदर्शकतेचा अभाव मी कुठल्याही पद्धतीने सहन करून घेणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिल्या. दिल्या. तसेच पुणे महापालिकेचा कारभार पारदर्शक करा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिला आहे..
पुढे बोलताना ते म्हणाले, कोणी कितीही मोठा असला तरी महानगरपालिकेत जनतेने दिलेल्या बहुमतापेक्षा मोठे कोणी नाही. जर लोकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करणार नसलो तर त्या जागेवर राहण्याचा आपल्याला अधिकार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. महापालिका निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांच अभिनंदन केलं.

या महापालिकेच्या निवडणुकीत पुण्यात इतिहास रचलेला आहे. सगळ्या विजयाचे शिल्पकार आहेत असा गौरव त्यांनी केला. पुणेकरांना जे आश्वासन दिले आहे ते त्या दोन वर्षातच आपल्याला काम सुरू झालेला दिसेल. केंद्र सरकार आणि राज्य सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले