इंदूरमधील विहरीवरील छत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यात वाढ…!

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये गुरूवारी इंदूरच्या स्नेह नगरमध्ये एका विहीरी वरील छत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती.
या घटनेतील विहीर ही अनेकवर्ष जुनी असल्याने लोकांना वाचविण्यासाठी वेळ लागत आहे. यासाठी लष्कराचे ७५ लोक आले असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम देखील तैनात आहे.
या घटनेतील मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघातामध्ये जवळपास ४० जणांचा मृत्यू झालाची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणच्या मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून दोन लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
दरम्यान, गुरुवारी मध्य प्रदेशातील इंदूरच्या ठाणे जुनी येथील पटेल नगर या ठिकाणी शिवमंदिरातील विहिरीचे छत कोसळल्याची घटना घडली. यावेळी अनेक लोक विहिरीत पडले होते. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न चालूच आहेत.