जगात सर्वात जास्त लोकसंख्या भारतात, तर देशातील कामकरी लोकसंख्या 97 कोटींच्या जवळपास
नवी दिल्ली : जगात सर्वात लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताचा नंबर लागला आहे. भरताने चीनला मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (UNFPA) च्या ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट’मध्ये हा दावा करण्यात आला आहे.
भारतीयांची लोकसंख्या 142.86 कोटी आणि चीनची 142.57 कोटी आहे. देशातील कार्यरत लोकसंख्या 97 कोटींच्या जवळपास आहे. हे एक चांगले चिन्ह मानले जाते. मोठ्या लोकसंख्येमध्ये संपत्ती वाढवल्याने स्थानिक वापर वाढेल, ज्यामुळे अर्थव्यवस्था बाह्य धक्क्यांसाठी अधिक लवचिक होईल.
फेब्रुवारी 2023 पर्यंतच्या UN डेटाच्या आधारे, विविध तज्ञांनी दावा केला होता की एप्रिल 2022 मध्ये भारत लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकेल. मात्र, अहवालात याची निश्चित तारीख नव्हती.
असे असताना चीन आणि भारताकडून मिळालेल्या माहितीच्या अनिश्चिततेमुळे तारीख सांगणे शक्य नसल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. 12 वर्षांपासून जनगणना झाली नाही.