केज कोर्टात मोठी घडामोड!! वाल्मिक कराडच्या सुनावणीवेळी धक्कादायक प्रकार, सरकारी वकिलाने अचानक घेतली माघार…

बीड : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडी तपासाला प्रचंड वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा आज स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यानंतर नियमानुसार आरोपी वाल्मिक कराड याचं मेडिकल करण्यात आलं.
त्यानंतर त्याला तातडीने बीडच्या केज कोर्टात आज रात्री उशिरा हजर करण्यात आलं. यावेळी आरोपीच्या रिमांडबाबत सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा जोरदार युक्तिवाद केला.
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी वाल्मिक कराडची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी चक्क दोन-दोन वकील दाखल झाले. तर सीआयडीची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील एस. एस. देशपांडे हे दाखल झाले. ते सीआयडीची बाजू कोर्टात मांडणार होते.
पण सुनावणीला अवघे काही क्षण सुरु असताना मोठी घडामोड घडली. सरकारी वकील एस. एस. देशपांडे यांनी कोर्टाकडे पत्र दिलं. त्यांनी वैयक्तिक कारणास्तव या प्रकरणात अन्य वकील नेमावा म्हणून पत्र दिलं. त्यामुळे आता जे बी शिंदे सरकारी वकील म्हणून युक्तिवाद करणार आहेत.
आधीचे सरकारी वकील देशपांडे यांनी केस सोडली आहे. दरम्यान, वाल्मिक कराडच्या बाजूने वकील हरिभाऊ गुठे आणि दूसरे वकील अशोक कवडे हे युक्तिवाद करणार आहेत. ते केज कोर्टात रात्री दहा वाजेपासून हजर आहेत.