पुण्यात कायद्याचे रक्षकच असुरक्षित ; वाहतूक कर्मचाऱ्यालाच टोळक्यांकडून बेदम मारहाण

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एका वाहतूक पोलिसाला कोंढव्यात ५ जणांच्या टोळक्याने नाका तोंडातून रक्त येईपर्यंत बेदम मारहाण केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कायद्याचे रक्षकच सुरक्षित नाहीत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पवन डिंबळे असे वाहतूक कर्मचाऱ्याचे नाव आहे. सध्या ते भारती विद्यापीठ विभागाच्या वाहतूक विभागात कार्यरत आहेत.ड्युटी संपवून घरी जात असताना,कोंढवा भागातील एका ठिकाणी लघुशंकेसाठी थांबले. तिथे काही जणं दारू पित असल्याचं निदर्शनास आल्यानंतर डिंबळे यांनी त्यांना हटकलं. यातून त्या तरुणांमध्ये आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाले. काही वेळात तिथे सबंधित तरुणांचे मित्र आले आणि त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करायला सुरुवात केलीपोलिस कर्मचाऱ्याने अंगात जॅकेट घातल्यामुळे संबंधित व्यक्ती कोण आहे हे त्या तरुणांना कळले नाही. जखमी पोलिस कर्मचाऱ्याला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास कऱण्यात येत आहे. हल्लेखोराच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. सीसीटीव्ही तपासले जात आहेत पुण्यात पोलीसच सुरक्षित नाहीत का? असा सवाल विचारला जात आहे.

