जर तुम्ही खरे भारतीय असाल तर…; सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधींना जोरदार झटका

नवी दिल्ली : भारतीय सैन्यासंबंधी कथित टिप्पणीवरुन राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने लखनऊ ट्रायल कोर्टाच्या समनला स्थगिती दिली आहे.

राहुल गांधी यांनी २०२० साली गलवान खोऱ्यात चीन बरोबर झालेल्या संघर्षावरुन एक स्टेटमेंट केलं होतं. त्यांनी सैन्य संबंधी टिप्पणी केली होती.

राहुल गांधी यांनी गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, चिनी सैन्य अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय जवानांना मारहाण करत आहे. यावरून त्यांच्या विरोधात उत्तर प्रदेशात खटला दाखल झाला होता.

या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती दत्ता यांनी विचारले, तुम्हाला कसं समजलं की चीनने 2000 चौ.कि.मी. जमीन ताब्यात घेतली आहे? याची खात्रीलायक माहिती काय आहे? एक सच्चा भारतीय असं वक्तव्य कधीच करणार नाही. जेव्हा सीमेवर तणाव असेल, तेव्हा अशा वक्तव्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो.
तुम्ही हे संसदेत का बोलला नाहीत? सोशय मीडियावर का बोललात? असं सुप्रीम कोर्टाने विचारलं. तुम्ही खरे भारतीय असाल, तर असं बोललं नाही पाहिजे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. भले तुमच्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, पण हे असं का म्हटलं?. तुम्ही एक जबाबदार नेता आहात असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. वरिष्ठ वकील सिंघवी म्हणाले की, “विरोधी पक्षाचे नेते म्हणून ते हे सर्व बोलू शकत नसतील, तर याला काय अर्थ आहे?
जस्टिस दत्ता यांनी विचारलं की, “तुम्हाला कसं समजलं चीनने 2000 वर्ग किलोमीटरच जमीन ताब्यात घेतली आहे? खात्रीलायक माहिती काय आहे?एक सच्चा भारतीय असं बोलणार नाही. जेव्हा सीमेवर वाद चालू असेल, तेव्हा तुम्ही असं बोलू शकता का?. तुम्ही संसदेत का विचारलं नाही?
लखनऊ कोर्टाच्या समन आदेशाला राहुल गांधींनी अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, मात्र ते फेटाळण्यात आलं. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देत समनवर स्थगिती दिली असून, याबाबत केंद्र सरकार आणि तक्रारदाराकडून उत्तर मागवण्यात आलं आहे.
