घरात आई नसली की सावत्र बाप ‘सैतान’ व्हायचा; 15 वर्षांच्या मुलीवर तब्बल दोन वर्ष अत्याचार, भयंकर कृत्यानं पनवेल हादरलं…


मुंबई : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पनवेलमधील करंजाडे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच सावत्र वडिलांकडून दीड ते दोन वर्ष अत्याचार करण्यात आल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आई आणि सावत्र वडिलांसोबत करंजाडे येथे राहत होती. आई घराबाहेर गेल्यानंतर मुलगी घरी एकटी असताना आरोपी सावत्र वडील तिच्यावर जबरदस्ती करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

भीती आणि धमक्यांमुळे अल्पवयीन मुलगी दीर्घकाळ गप्प राहिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात आरोपीचा इमारतीतील शेजाऱ्यांसोबत वाद झाल्यानंतर झालेल्या मारहाणीप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाणे यांनी त्याला अटक केली होती. सध्या आरोपी तळोजा केंद्रीय कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

याच काळात पीडित मुलीने आईसमोर अत्याचाराची माहिती दिल्यानंतर आईने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपी सावत्र वडिलांविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!