…फक्त उपेक्षाच वाट्याला आली! मनसे सोडल्यावर प्रकाश महाजनांनी व्यक्त केली खंत


पुणे : महापालिका आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा देत मनसेला रामराम केला. त्यानंतर आता त्यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.गेल्या काही काळात पक्षातून फक्त उपेक्षा सहन करावी लागली आहे. त्यांच्या क्षमता आणि योग्यतेनुसार त्यांना पुरेसे काम आणि मान मिळाले नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसापासून प्रकाश महाजन पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा होती. काही महत्त्वाच्या कार्यक्रमापासून आणि मेळाव्यापासून त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचं बोलल जात असतानाच आता पक्षात त्यांना योग्य स्थान मिळाले नाही याचा त्यांना दुःख आहे. पक्षात असताना उपेक्षाच वाट्याला आल्याची खदखद व्यक्त केली आहे. महाजन यांनी राज ठाकरे यांच्या बद्दल आदर व्यक्त करत अमित ठाकरे यांच्याशी असलेल्या संबंधाचा उल्लेख केला आणि त्यांच्यासाठी असलेली आपली सदभावना स्पष्ट केली. राजीनामा देण्यामागील कारण म्हणून त्यांनी पक्षाला स्वतःची आवश्यकता नसल्याचे मत व्यक्त केले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, माझं थोडं वय वाढल आहे आणि काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात त्यामुळे मी थांबायचं ठरवलं आहे.माझं बाकी कोणावरही राग नाही असेही त्यांनी स्पष्ट केल आहे. प्रकाश महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची धाकटे भाऊ आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रिय होते. मराठवाड्यातील प्रमुख नेता म्हणून त्यांचा प्रभाव मानला जायचा. पक्षाला रामराम केल्याने मनसेला मोठ्या नेत्याला गमवावे लागले आहे. दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!