पतीने केला घात, पुण्यातील तरुणीला बंगळुरूला नेत केले तुकडे, घटनेने राज्य हादरले..

पुणे : पुण्यातील एका ३६ वर्षीय आयटी इंजिनिअरने स्वतःच्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बंगळुरूतील दोड्डाकम्मनहल्ली भागातील असून, पोलिसांनी आरोपी पतीला पुण्याजवळून अटक केली आहे.
गौरी खेडेकर (वय. ३२) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. राकेश राजेंद्र खेडेकर (वय. ३६) असे आरोपीचं नाव आहे.
मिळलेल्या माहिती नुसार, राजेंद्र खेडेकर तो एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याची पत्नी गौरी सांबरेकर ही मास मीडियाची पदवीधर असून नोकरीच्या शोधात होती. दोघंही महिनाभरापूर्वीच बंगळुरूतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले होते.
तसेच गौरी आणि राकेश यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. भांडण उग्र झाल्यानंतर राकेशने चाकूने गौरीच्या पोटात आणि छातीत वार करून तिचा खून केला. हत्येनंतर त्याने तिचा मृतदेह एका मोठ्या सूटकेसमध्ये भरून घराला कुलूप लावलं आणि पुण्यात पळून आला.
राकेशने गुरुवारी संध्याकाळी सुमारे ५.३० वाजता बंगळुरूतील आपल्या घरमालकाला फोन करून पत्नीच्या खुनाची कबुली दिली. त्यानेच घरमालकाला पोलिसांशी संपर्क करण्यास सांगितलं आणि गौरीच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कारासाठी माहिती द्यायला सांगितली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि फ्लॅटची तपासणी केली असता, सूटकेसमध्ये गौरीचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, बंगळुरू पोलीस विभागाचे उपायुक्त सारा फातिमा यांनी सांगितले की, राकेश खेडेकरला पुण्याजवळ २४ तासांच्या आत ताब्यात घेण्यात आले. आता त्याला बंगळुरूला आणण्यात येत असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. राकेशने खुनाची कबुली दिली असली तरी हत्येमागील खरे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.