बारावीचा निकाल जाहीर, पाच वर्षातील सर्वात कमी टक्के निकाल!


पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल (HSC Result 2026) आज जाहीर झाला असून यंदा राज्याचा निकाल 89.79 टक्के इतका लागला आहे. मागील 5 वर्षांच्या तुलनेत हा सर्वात कमी निकाल ठरला आहे.

2022 मध्ये निकाल 94.22%, 2023 मध्ये 93.73%, 2024 मध्ये 93.37%, 2025 मध्ये 91.88% तर 2026 मध्ये तो 89.79% इतका झाला आहे. म्हणजेच दरवर्षी टप्प्याटप्प्याने घट होत असल्याचे स्पष्ट दिसते.

या वर्षी सुमारे 14.58 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारत 93.15% उत्तीर्ण दर नोंदवला, तर मुलांचा निकाल 86.80% राहिला.

विभागनिहाय निकालात कोकण विभाग 94.14% सह अव्वल ठरला, तर लातूर विभाग 84.14% सह सर्वात कमी राहिला. पुणे 91.25%, मुंबई 90.08%, नागपूर 88.67%, नाशिक 90.72%, अमरावती 90.92%, छत्रपती संभाजीनगर 88.68% आणि कोल्हापूर 89.97% असा निकाल लागला आहे.

मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, यंदा कॉपीमुक्त अभियान काटेकोरपणे राबवण्यात आले. सीसीटीव्ही निरीक्षण, कडक तपासणी आणि कारवाईमुळे निकालाचा टक्का कमी झाला आहे. यंदा 100 कर्मचाऱ्यांवर कारवाई आणि 15 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

निकाल mahahsscboard.in, mahresult.nic.in आणि DigiLocker वर पाहता येईल. तसेच SMS द्वारेही निकाल मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!