पाकिस्तानात एअर स्ट्राइक करणाऱ्या एका ब्रह्मोस मिसाइलची किंमत किती? आता माहिती आली समोर..

नवी दिल्ली : सध्या भारत आणि पाकिस्तानदरम्यान प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झालं असताना युद्ध बंदीची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानकडून मात्र हल्ले सुरूच आहेत. असे असताना मध्यरात्री जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्याजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
असे असताना मात्र सीमा सुरक्षा दलाने तत्परतेने ही घुसखोरी थोपवून धरली. या कारवाईत भारतीय सैन्याने सात दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. आता या पाठोपाठ भारतीय सैन्याकडून 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यामुळे ही एक मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. भारत-पाकिस्तानमध्ये 10 मे रोजी सीजफायर झालं. पण त्याआधी भारताने पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून प्रचंड हल्ले केले.
यामध्ये मेड इन इंडिया सुपरसोनिक क्रूज ब्रह्मोस मिसाइलने महत्त्वाची भूमिका बजावली. 22 एप्रिल रोजी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे 26 भारतीय पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर तणाव सुरु झाला. भारताने प्रत्युत्तर म्हणून 7 मे रोजी पाकिस्तानात एअर स्ट्राइक केला. त्यांचे 9 दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले.
यासाठी भारताने आपलं मेड इन इंडिया सुपरसोनिक क्रूज ब्रह्मोस मिसाइल वापरलं होते. या मिसाइलने पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टिमला चकवा देऊन पाकिस्तानातील दहशतवादी ट्रेनिंग तळ उडवले. ब्रह्मोसच्या प्रोडक्शन यूनिटचा खर्च जवळपास 300 कोटी रुपये आहे. एका मिसाइलची किंमत जवळपास 34 कोटी रुपये आहे.
ब्रह्मोस मिसाइल भारत आणि रशियाने मिळून तयार केल आहे. या मिसाइलला डेवलप करण्यासाठी 250 मिलियन डॉलर खर्च झालाआहे. हा खर्च 2,135 कोटी रुपये होतो. सुपरसॉनिक ब्रह्मोस मिसाइलची रेंज 290 किलोमीटर आहे. याच्या Advance वर्जनची रेंज 500 ते 800 किलोमीटर आहे. हे मिसाइल 200 ते 300 किलोग्रॅम स्फोटकं घेऊन जाण्यास सक्षम आहे.
सोबतच हे मिसाइल शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टिमला चकवा देऊन टार्गेट उद्धवस्त करण्यास सक्षम आहे.या मिसाइलने पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टिमला चकवा देऊन पाकिस्तानातील दहशतवादी ट्रेनिंग तळ उडवले. यामुळे याची जोरदार चर्चा सगळीकडे झाली. यामुळे याची नेमकी किंमत किती अनेकांना पडला होता.