पोलिसांनी माझं किती व्हिडीओ काढले तरी, ते माझ्या बायकोलाच दाखवू शकतील, नितेश राणेंचे धक्कादायक विधान..!


Nitesh Rane : पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही, असे भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले आहे. माझे कितीही व्हिडिओ काढले तरी पोलीस ते व्हिडीओ फक्त बायकोलाच दाखवतील असंही नितेश राणे म्हणाले आहे. या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नितेश राणे यांनी पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील निंबा फाटा या ठिकाणी हिंदू समाजाच्या वतीने एक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सभेमध्ये बोलताना नितेश राणे म्हणाले, “पोलिसांना माझे भाषण रेकॉर्ड करू दे.. जास्तीत जास्त काय करतील तर ते फक्त बायकोला दाखवतील.. आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकाल? जागेवर राहायचं आहे. असं वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.

तुम्ही काही चिंता करु नका. हे सरकार हिंदुत्ववाद्याचे आहे. सरकारमध्ये असे पर्यंत कुठल्याही हिंदूला कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही अशी ताकद आम्ही हिंदूंच्या मागे उभी केली आहे, असेही नितेश राणे म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!