पुढच्या वर्षी सोनं किती महागणार? काय असेल रेट?, बाबा वेंगाची थक्क करणारी भविष्यवाणी…

नवी दिल्ली : दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. घरोघरी फराळाचे सुवास दरवळत आहेत. दिवाळी म्हटलं की खरेदीही आलीच. कपडे, फटाके यांसोबतच सणानिमित्र बहुतांश लोकं हे एखादा दागिना घेतात. सोन्याच्या दागिन्यांना कायमच मागणी असते.

मात्र सध्या सोन्याचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सोन्याची किंमत पाहून सर्वांनाचा धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या घसरणीने दिलासा मिळाला असला तरी, भविष्यात सोने किती महागणार, हा प्रश्न कायम आहे. आता बाबा वेंगाच्या भविष्यवाणीच्या आधारे AI ग्रोकने २०२६ साठी एक धक्कादायक अंदाज वर्तवला आहे.

यावर्षी सोन्याने मोठी उसळी घेतली, देशांतर्गत स्पॉट मार्केटमध्ये भाव ७० टक्क्यांहून अधिक वाढले. जागतिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकांची जोरदार खरेदी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा यामुळे ही वाढ झाली. मात्र, धनत्रयोदशीला एमसीएक्स वर दर २% घसरून १ लाख २७ हजार ३२० रुपये प्रति १० ग्रॅमवर आले, कारण अमेरिकन डॉलर मजबूत झाला आणि अमेरिका-चीनमधील तणाव कमी झाला.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील १००% शुल्क टिकाऊ नसल्याचे म्हटल्याने गुंतवणूकदार सावध झाले आहेत. विक्रमी भाववाढीनंतर आता नफावसुलीकडे कल वाढत आहे, अनेकजण गोल्ड ईटीएफमधून पैसे काढत आहेत.
जरी सेंट्रल बँका सोने खरेदी करत असल्या, तरी बाजारातील एकूण अनिश्चितता कमी झाल्याने सोन्याच्या किमतीवर दबाव येत आहे. तज्ज्ञांच्या मते, यावर्षीची तेजी पारंपरिक कारणांऐवजी जागतिक वित्तीय व्यवस्थेतील बदलांचे संकेत देत आहे.
AI ग्रोकला बाबा वेंगाच्या भविष्यवाणीच्या आधारे २०२६ च्या दिवाळीतील सोन्याच्या भावाबाबत विचारले असता, धक्कादायक उत्तर मिळाले. ग्रोकनुसार, २०२६ मध्ये जागतिक आर्थिक संकट (‘कॅश क्रश’) येऊ शकते, ज्यामुळे चलन व्यवस्था कोलमडेल, बँकिंग संकट येईल आणि बाजारात तरलतेचा अभाव जाणवेल. इतिहासात अशा काळात सोन्याच्या किमती २० ते ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
दरम्यान, या संभाव्य संकटामुळे, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी प्रचंड वाढेल. बाबा वेंगाच्या भाकितानुसार मंदी आल्यास, सध्याच्या १.३० लाखांच्या पातळीवरून सोन्याच्या किमतीत पुढील दिवाळीपर्यंत (ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६) २५ ते ४० टक्के वाढ होऊ शकते. याचा अर्थ, १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ६२ हजार ५०० ते १ लाख ८२ हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचू शकतो. हा अंदाज जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि सोन्याच्या वाढत्या मागणीवर आधारित आहे.
