तरुणीच्या किंकाळ्या ऐकू आल्या अन् हॉटेल कर्मचाऱ्यांनी दार उघडलं; रूम नंबर 302 मध्ये नेमकं काय घडलं?

नागपूर : नागपुरातील मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणीची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे 18वर्षीय शिवानी गजभिये असं मृत तरुणीचं नाव आहे, तर किरण आत्राम असं जखमी इसमाचं नाव आहे.
ही घटना हॉटेलच्या रूम क्रमांक 302 मध्ये घडली. प्राथमिक माहितीनुसार, शिवानी आणि किरण हे दोघेही रेल्वे कर्मचारी होते. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याचा अंदाज आहे.

रुम नंबर 302 मध्ये काय घडलं?
आरोपी किरण आणि 28 वर्षीय शिवानी हे दोघं हॉटेलमध्ये गेले होते. दोघंही रेल्वे कर्मचारी होते. कोणत्यातरी मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. रुम नंबर 302 मध्ये गेल्यावर देखील दोघांमध्ये भांडण झालं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


त्यानंतर मंगळवारी सुमारे साडे नऊच्या सुमारास रूममधून अचानक किंकाळ्या येऊ लागल्या. त्यानंतर हॉटेलचा स्टाफ सतर्क झाला अन् स्टाफने चावीने रुमचा दरवाजा उघडला. रुम उघडून बघितलं तर काय.. सर्वांच्या पायाखलची जमीनच सरकली.
रूममधून किंकाळ्या ऐकू आल्या
मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रूममधून किंकाळ्या ऐकू आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. रूममध्ये दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते, तर बाजूलाच चाकू आढळून आला. आरोपी किरणने शिवानीची हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.
दोघांमधील वादानंतर किरणने शिवानीवर चाकूने हल्ला केला आणि त्यानंतर स्वतःलाही जखमी केल्याचा प्राथमिक संशय आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीनो पोलिसांना फोन केला अन् घटनेची माहिती दिली.
बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात हलवलं. पण वाटेतच शिवानीचा मृत्यू झाला असून किरणवर उपचार सुरू आहेत. या रक्तरंजित घटनेमागचं नेमकं कारण काय, हल्ला पूर्वनियोजित होता का, याचा बेलतरोडी पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणामुळे नागपुरात एकच खळबळ उडाल्याचं दिसत आहे.