पुण्यात भयंकर प्रकार! बायकोच्या मनाविरुद्ध शरीरसंबंध, गुप्तांगात हळदी-कुंकू लावलेलं लिंबू पिळलं अन्….


पुणे : पतीने पत्नीसोबत अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात नवी सांगवी परिसरात समोर आला आहे. पत्नीने कोर्टात पोटगीचा दावा दाखल केल्याचा राग अनावर झाल्यामुळे पतीने आधी गळ्याला कोयता लावत तिच्या इच्छेविरोधात जबरदस्ती शारीरिक अत्याचार केला.

त्यानंतर हळदी-कुंकू लावलेल्या लिंबाच्या चार फोडी पत्नीच्या गुप्तांगात पिळल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार विशालनगर पिंपळे निलख येथे वर्षभरापूर्वी घडलेला आहे. याबाबत ३६ वर्षीय पीडित महिलेने( ता. ११) एप्रिल रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पती या दोघांचा २००२ मध्ये विवाह झाला आहे. या दाम्पत्याला २ मुले आहेत. लग्नाच्या काही वर्षांनंतर पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

त्यामुळे दोघांमध्ये सातयताने वाद होत होते. या वादाला कंटाळून पीडिता मुलांना घेऊन बालेवाडी येथे राहण्यासाठी गेली. त्यानंतर आरोपी पती पिंपळे निलख परिसरात दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेला.

दरम्यान, मुलांची शाळा सुरू होणार असल्याने आणि त्यांची वह्या पुस्तके पतीच्या घरीच असल्याने पत्नी ते आणण्यासाठी पतीच्या घरी गेली. त्यावेळी महिलेची आई, मामी आणि मुले ही सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबली होती. तर पत्नी वरील मजल्यावर असलेल्या फ्लॅटमधून साहित्य घेण्यासाठी गेली होती.

यावेळी तिचा पती दारू प्यायलेला होता. मुलांच्या शाळेच्या साहित्यासाठी आली आणि काय काय सामान घेऊन जाते, असे म्हणत पतीने पीडित पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पतीने मद्यप्राशन केले असल्यामुळे पत्नीने त्याला प्रत्युत्तर दिले नाही. पण, ‘मी बोलतो तरी माझ्याकडे बघत नाही’ असे म्हणत पतीने घरातील कोयता काढला. त्यानंतर हा कोयता पत्नीच्या गळ्यावर ठेवला.

त्यानंतर पत्नीला त्याने जबरदस्तीने कपडे काढायला लावले. त्यानंतर पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पतीने घरातून हळदी कुंकू लावलेल्या लिंबाच्या चार फोडी आणल्या. लिंबाच्या फोडी पतीने पत्नीच्या गुप्तांगात पिळल्या.

दरम्यान, मी तुझ्यावर जादूटोणा केला आहे. तू आता वेडी होणार आहेस. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझा मर्डर करतो’ अशी धमकीही त्याने दिली. हा भयंकर प्रकार घडल्यावर संबंधित महिला कोणाला काही न बोलता आई आणि मुलांसह घरी गेली.

काही दिवसानंतर तिने हा प्रकार आपल्या आई आणि मामीला सांगितला. या प्रकरणी फिर्यादी हिने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!