कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ! रुग्णसंख्या 16 हजारांपेक्षा जास्त, बाहेरून येणाऱ्याची चाचणी होणार…!


पुणे : सध्या गेल्या काही दिवसांपासून कोरोना पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चीन आणि दुबईतून भारतात येणार्‍या प्रवाशांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्‍यावी, अशी सूचना टास्‍क फोर्सच्‍या वतीने करण्‍यात आली अली आहे.

 

दरम्यान, देशात सलग तिसर्‍या दिवशी कोरोना रुग्‍णसंख्‍येत वाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत कोरोनाचे 2994 नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्या १६,३५४ वर पोहोचली आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

 

काल देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे ३ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्‍यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या १५,२०८ वर पोहोचली होती. यामुळे आता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

 

दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेने कोविडनंतर हृदयविकाराच्या घटनांबाबत अभ्यास सुरू केला आहे. यामध्ये कोविड आणि आणि हृदयविकाराचा झटका यांचा काही संबंध आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!