‘आज इथे, उद्या कुठे?’ संजय जाधवांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ; शिंदे गटात एन्ट्रीची चर्चा जोरात


परभणी : राजकारणात सध्या मोठे भूकंप होण्याचे संकेत दिसत असतानाच शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय जाधव यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचं सांगता येत नाही,” या एका वाक्यानेच त्यांनी राजकीय चर्चांना अक्षरशः पेटवून दिलं आहे.

परभणीतल्या कार्यक्रमात बोलताना जाधव यांनी पक्षनिष्ठा व्यक्त केली खरी, पण बदलत्या राजकीय वाऱ्यांचा इशाराही दिला. “ज्यांनी मला मोठं केलं त्यांचा आदर आहे, पण परिस्थिती कधीही बदलू शकते,” असं सांगत त्यांनी पुढच्या निर्णयाबाबत सस्पेन्स कायम ठेवला.

इतकंच नाही तर त्यांनी सध्याच्या राजकारणावरही तिखट भाष्य केलं. “आजचं राजकारण हे समाजकारण राहिलेलं नाही, तर पैशांचं खेळ बनलंय,” असं म्हणत त्यांनी थेट टोला लगावला. मतदारही पैशांकडे झुकत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

जाधव यांचं हे सूचक वक्तव्य म्हणजे ‘पोलिटिकल सिग्नल’ असल्याची चर्चा रंगली आहे. जर त्यांनी शिंदे गटाची वाट धरली, तर मराठवाड्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो. आता सगळ्यांच्या नजरा जाधवांच्या पुढच्या पावलावर खिळल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!