Hemant Godse : महायुतीत राजकीय भूकंप होणार! भुजबळांना उमेदवारी निश्चित झाल्याने हेमंत गोडसे मोठा निर्णय घेणार…

Hemant Godse : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच पक्षांनी तिकीट नाकारल्याने नाराज नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.

अशातच आता राज्याच्या राजकाणातील महत्वाची बातमी समोर येत असून, महायुतीमधील नाशिकच्या जागेवरून आता मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या नाव निश्चित समजले जात असतांना शिंदे गटाचे इच्छुक हेमंत गोडसे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
हेंमत गोडसें आणि शिवसेना पदाधिकारी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर ही नाशिकची जागा शिवसेनेला सुटली नाही तर गोडसें अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध गोडसें यांच्यात चौथ्यांदा लढत होण्याची शक्यता आहे. Hemant Godse

नाशिक लोकसभा मतदारसंघातुन हेंमत गोडसें यांची उमेदवारी पक्की मानली जात असताना अचानक छगन भुजबळ यांचे नाव समोर आल्यानं हेंमत गॉडसे आणि शिवसैनिकांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे.

सलग दोन टर्म खासदार असणाऱ्या शिवसेनेच्या हेंमत गोडसें यांच्या उमेदवारी बाबत अनिश्चितता असल्यानं गोडसें अपक्ष लढण्याची शक्यता आहे. भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोडसें भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या आधी तीन वेळा गोडसें आणि भुजबळ यांच्या सामना झालेला आहे.
दरम्यान, २००९ च्या निवडणुकीत समीर भुजबळ यांच्याकडून २२ हजारांच्या फरकाने पराभव झालेल्या गोडसेंनी पुढील दोन निवडणुकीत छगन भुजबळ आणि समीर भुजबळ दोघांना ही धोबीपछाड देत भगवा फडकवला होता.