तो भुंकला अन् 67 गावकऱ्यांचे जीव वाचले, झाली असती माळीणसारखी दुर्घटना, नेमकं घडलं काय?

सध्या हिमाचलमधील मंडीमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. याठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील धर्मपूर भागातील सियाठी गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तब्बल 11 वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या माळीणमध्येही अशीच घटना घडली होती. याठिकाणी देखील असच काही झालं असत, पण एका कुत्र्याने 67 लोकांचे जीव वाचवले.

मंडीतील गावकऱ्यांना आजही ती भयाण रात्री आठवली तरी भीती वाटते. गावातील एक कुत्र्यामुळे या 67 जणांचे प्राण बचावले. कुत्रा जर भुंकला नसता तर कोणीच वाचू शकलं नसतं. सध्या येथील गावकऱ्यांनी मंदिरात आश्रय घेतला आहे. कुत्रा सतत रडत होता. त्यामुळे सगळे झोपेतून जागे झालो. जेव्हा मी कुत्र्याच्या जवळ गेले तेव्हा पाहिलं की, घराला एक मोठी भेग पडली होती. पाणी अत्यंत वेगाने घरात शिरत होते.

मी कुत्र्याला घेऊन खाली गेलो आणि कुटुंबातील सर्वांना जागं केलं, असं गावकऱ्यांनी सांगितलं. झोपलेला कुत्रा अचानक भुंकू लागला आणि त्यानंतर रडू लागला. यानंतर गावातील इतर लोकांनाही जागं केलं आणि सुरक्षित ठिकाणी हलवलं. त्यांनी वरच्या बाजूला असलेल्या त्रियंबला गावातील लोकांना फोन केला.

नंतर या आपत्तीची माहिती दिली. यामुळे अनेकांचा जीव वाचला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. सियाठी गावातील पुरुष आणि महिला चप्पल न घालताच पळत सुटले. यानंतर काही वेळात डोंगराचा मोठा भाग गावावर कोसळला. अनेक घरं त्याखाली दबली गेली. सगळं गाव ढिगाऱ्याखाली गेले. यामुळे अनेकांचे जीव वाचले.
दरम्यान, याठिकाणी मोठ्या पाऊस झाल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. अनेक नद्या भरून वाहत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात देखील काळजी घेण्याची गरज आहे. याठिकाणी केंद्रीय पथक देखील बचावकार्य करत आहेत. यामुळे अनेकांचे हाल देखील झाले आहेत.
