हडपसर पोलिसांनी स्त्री सन्मानाच्या सुरक्षेसाठी २४ तासांत दाखल केले दोषरोपपत्र ! माळवाडी येथील रिक्षाचालकाने केले होते अश्लील कृत्य…


लोणी काळभोर : रिक्षामध्ये बसल्या असता रिक्षाचालकाने फिर्यादी यांना घाणेरड्या व अश्लिल पध्दतीने हात लावला. या कृत्यामुळे फिर्यादीच्या मनास तीव्र लज्जा उत्पन्न झाली. तिच्या सन्मानाच्या सुरक्षेसाठी सदरबाबत गुन्हा दाखल झालेनंतर अवघ्या २४ तासांच्या आतच आरोपीविरूध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (९ऑक्टोबर) रोजी रोजी एक महिला माळवाडी येथून गाडीतळ -हडपसर असा प्रवास करीत असताना अग्रवाल स्वीट, सोलापूर रोड, गाडीतळ हडपसर पुणे येथे एका रिक्षामध्ये बसल्या. यावेळी रिक्षाचालकाने त्यांना घाणेरड्या व अश्लिल पध्दतीने हात लावला. या कृत्यामुळे त्या महिलेच्या मनास तीव्र लज्जा उत्पन्न झाली. सदरबाबत तिने हडपसर पोलीसठाण्यात तक्रार दाखल केली यांवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गुन्ह्याचे गांभिर्य ओळखुन, आरोपी लवकरात लवकर निष्पन्न करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या देखरेखीखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले.

       

तपास पथकाने घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्याचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर संशयीत आरोपी शैलेश गुंडराव पाटील (वय २९, रा. मांजरी पुणे) याची ओळख पटवून त्यास ताब्यात घेण्यात आले. हडपसर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार यांनी सदर गंभीर गुन्ह्यातील साक्षीदारांचे जबाब नोंदवून, सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे गोळा केले. पुरावे भक्कम करून केवळ २४ तासांच्या आतच आरोपीविरूध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांचे सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार संदीप राठोड, अमित साखरे, बापु लोणकर, अभिजीत राऊत, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, विनोद शिर्के, संभाजी म्हांगरे, स्वप्नाली मोरे, मिरा रंदवे, साधना राठोड, पुनम खामकर व अमोल जाधव यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!