शेतकरी कर्जमाफी योजनेची मोठी खुशखबर! सरकारने उघडले विशेष खाते, पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबई : शेतकरी कर्जमाफीचा मुहूर्त दोनदा पुढे ढकलल्यानंतर शेतकऱ्यांचे लक्ष आता सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे. मात्र, कर्जमाफीसाठीची प्रशासकीय प्रक्रिया वेगाने सुरू असून, पात्र शेतकऱ्यांना वेळेत लाभ मिळावा यासाठी सरकारकडून तयारी करण्यात येत आहे.

कर्जमाफी योजनेत आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ न देण्याच्या धोरणावर काम सुरू आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची छाननी केली जात असून, या प्रक्रियेमुळे कर्जमाफीला विलंब झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, निधी वितरणाची यंत्रणा तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये उघडले विशेष खाते
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यासाठी Bank of Maharashtra मध्ये पूल बँक खाते सुरू करण्यात आले आहे.

सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या नावाने मुंबईतील गव्हर्नमेंट बिझनेस शाखेत हे खाते उघडण्यात आले आहे. या खात्यामधून पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी वितरित केला जाणार आहे.

एका क्लिकवर खात्यात जमा होणार पैसे
पूल बँक खात्याच्या माध्यमातून एकाचवेळी अनेक लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये निधी पाठवणे शक्य होणार आहे. या प्रक्रियेमुळे निधी वितरणावर नियंत्रण आणि देखरेख ठेवणे सोपे होणार आहे.
कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार असून, पारदर्शकता राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रक्रियेचे व्यवस्थापन महाआयटीकडून केले जात असल्याचे सांगितले जात आहे.
पूल बँक खाते म्हणजे काय?
पूल बँक खात्यामध्ये एक मुख्य खाते आणि त्याला जोडलेली उप-खाती असतात. एका केंद्रीय खात्यातून अनेक लाभार्थ्यांना एकाचवेळी निधी वितरित करता येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ आणि जलद होतात.
कर्जमाफी कधी मिळणार?
आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची छाननी पूर्ण करण्यासाठी कर्जमाफी योजनेला विलंब झाला आहे. ही प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असून, पुढील आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.