आजोबांसोबत नातू झाडाखाली थांबला होता, अचानक वीज पडली, आवाजाने इतका घाबरला की त्यातच त्याचा दुःखद अंत झाला, कुटुंबावर शोककळा…

पैठण : पैठण तालुक्यातील आडुळ खुर्द या गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आजोबांसह झाडाच्या आडोशाला थांबलेला ९ वर्षाचा सिद्धेश्वर अंकुश पाचे या मुलाच्या समोर काही अंतरावरच वीज पडली.
या विजेचा आवाज एवढा मोठा होता की, त्या आवाजाने घाबरून सिद्धेश्वरचा मृत्यू झाला आहे. या घटनेने नंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेचार च्या सुमारास पैठण तालुक्यातील आडुळ खुर्द या गावात घडली.
सविस्तर माहिती अशी की, गावातील शेतकरी एकनाथ सांडू पाचे हे नातू सिद्धेश्वर व नात राणी अंकुश पाचे या दोघांना घेऊन शाळा सुटल्यानंतर आपल्या शेतात गेले होते. धुळे सोलापुर राष्ट्रीय महामार्गालगत पाचे यांची जमीन असून संध्याकाळी अचानक जोरदार वादळी वारा सुरू झाला.
आभाळ भरून आले. त्यामुळे आडोशासाठी शेतातील लिंबाच्या झाडाखाली ही तिघेजण थांबले. मात्र ते ज्या ठिकाणी थांबले होते, त्यापासून अगदी काहीच अंतरावर दुसऱ्या एका झाडावर मोठी वीज कोसळली.
या विजेचा प्रचंड मोठा आवाज आला. या आवाजाने घाबरूनच सिद्धेश्वर चा मृत्यू झाला. सिद्धेश्वर ल छत्रपती संभाजी नगरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.