मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिलासादायक बातमी!! एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या…

मुंबई : आज १९ किलोचे व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १७ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत या सिलिंडरची किंमत १७१३.५० रुपयांवरून १६९९ रुपये झाला आहे.
तसेच चेन्नईत १९२१.५० रुपयांऐवजी १९०६.५० रुपये करण्यात आली आहे. दिल्लीत १९ किलोचा व्यवसायिक सिलिंडर १७४७.५० रुपयांना मिळणार आहे. घरगुती एलपीजी गॅसचे दर ८ एप्रिल रोजी अपडेट करण्यात आले होते. तेव्हा सरकारने १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली.
यामुळे तेव्हापासून आजपर्यंत हे दर स्थिर होते. ही वाढ जवळपास वर्षभरानंतर झाली. देशात १०.३३ कोटी उज्ज्वला योजनेअंतर्गत आहेत, जिथे गरिबांना ३०० रुपये कमी किंमतीत सिलिंडर मिळतात. अर्थसंकल्पात सरकारनं एलपीजी सबसिडीसाठी ११,१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
गेल्या वर्षी इंधन कंपन्या तोट्यात सिलिंडर विकत असल्याने त्यांना २२ हजार कोटी रुपये देण्यात आले होते. १ एप्रिल रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. दिल्लीत १९ किलोचा एलपीजी सिलिंडर ४१ रुपयांनी स्वस्त होऊन १७६२ रुपये झाला असून आज १ मे रोजी दरात कपात करण्यात आली आहे.