पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी बस सेवा सुरू, जाणून घ्या सगळी माहिती…


पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडून एक पर्यटन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस सेवा पुणे ते लोणावळा दरम्यान चालवली जाणार आहे. यामुळे पर्यटकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. लोणावळ्यात पर्यटकांची तुंबळ गर्दी पाहायला मिळते म्हणून पुणे ते लोणावळा दरम्यान विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यामुळे लोणावळ्याला पिकनिक साठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत मागणी केली जात होती. रूट नंबर 11 वर ही बस सेवा सुरू केली आहे. स्वारगेट स्थानकावरून ही बस सोडली जाणार आहे. ही इलेक्ट्रिक बस चालवली जाणार आहे. पीएमपीएमएलच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी याला झेंडा दाखवला आहे.

स्वारगेट बस स्थानकातून सुटल्यानंतर डेक्कन जिमखाना, एकवीरा देवी मंदिर आणि कार्ला गुफा या ठिकाणी थांबा घेईल, ही बस लोणावळा बसस्थानकातून त्याच दिवशी स्वारगेटकडे रवाना होणार आहे. यामुळे आता ही सोय सुखकर होईल.

या बसने स्वारगेट वरून लोणावळ्याला जाण्यासाठी पाचशे रुपये प्रति व्यक्ती इतके तिकीट लागणार आहे. दरम्यान, शहरातील प्रमुख पीएमपीएमएलच्या पास सेंटरवर जाऊन या बससाठी तिकीट बुक करता येणार आहे. यामुळे आता पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!