सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या…


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

सोने प्रतितोळा सह १,३५,००० रुपयांवर पोहोचल्याने खरेदी थंडावली होती. मात्र, आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दरांमध्ये घसरण झाल्याने बाजारात पुन्हा एकदा खरेदीसाठी उत्साह संचारला आहे.

       

तसेच धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. आज सोन्याच्या भावात तीन हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली, ज्यामुळे सह सोन्याचा भाव १,३२,००० रुपये प्रतितोळा झाला आहे. गेल्या आठवड्यात भारतातील सोन्याचे दर एका तोळ्यासाठी १ लाख २० हजारांच्या आसपास होते.

दरम्यान, सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एका माहितीनुसार, चांदीचे दर १,७८,००० रुपयांवरून १,७०,००० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर, दुसऱ्या एका अहवालानुसार, गेल्या आठवड्यात प्रति किलो १,९०,००० रुपयांपर्यंत पोहोचलेले चांदीचे भाव, आज एक लाख ७२ हजार रुपयांपर्यंत घसरल्याचे दिसून येत आहे. या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जागतिक स्तरावर सोन्याच्या दरात २०२५ या वर्षात ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, भावाने ४००० अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. या वर्षात दरांनी ३५ वेळा हा टप्पा गाठला आहे. तज्ज्ञांच्या मते, भविष्यात सोन्याचे दर प्रति औंस ४५०० डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. तर भारतात, येत्या काळात सोन्याचे दर पुन्हा १.३५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असाही अंदाज आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!