शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा..

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता कधी मिळणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. पण आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे.
पीएम किसान सम्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता कधी जमा होणार याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. येत्या २८ जुलैला पीएम किसान १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे तोमर म्हणाले.
याबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण की, सध्या काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे तर काहींची अजूनही पेरणी बाकी आहे.
त्यामुळे आर्थिक सहाय्य मिळावे असे शेतकऱ्यांना वाटत होते. अशातच आता या हप्त्याची तारीख देखील निश्चित झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये दिले जातात. केंद्र सरकार हे पैसे २००० – २००० रुपयांच्या ३ हप्त्यांमध्ये देते. प्रत्येक हप्ता ४ महिन्यांत जारी केला जातो. यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर इ केवायसी केली नसेल तर लगेच करा अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकता.
वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता १४ वा हप्ता जारी करतील. यासोबतच ते लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. याआधीही खुद्द पीएम मोदींनी अनेक हप्ते जारी केले आहेत.