शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा, जाणून घ्या..


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दुधाचे अनुदान रखडले होते. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. अखेर काही ठिकाणी हे अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे ऐन टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अनुदानामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक चक्राला गती मिळाली आहे. टंचाईच्या काळात अनुदानाची रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप जमा झाले नाही, त्यांच्यासाठीही लवकरच प्रक्रिया पूर्ण होईल, असेही सरकारकडून सांगितले जात आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. दूधउत्पादकांना न्याय मिळावा, यासाठी सरकारने अनुदानाचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणीही वेगाने होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अनुदान रखडल्याने शेतकऱ्यांना पशुखाद्य आणि चारा खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होण्यास सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांना पशुखाद्य आणि इतर गरजांसाठी पैसे उपलब्ध झाले आहेत.

असे असले तरी अनेक ठिकाणी अजूनही अनुदानाची शेतकरी वाट बघत आहेत. अनेकांना अजूनही पहिल्यापासून अनुदान भेटले नाही. यामुळे याकडे देखील सरकारने लक्ष देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. जर दुधाला हमीभाव दर दिला तर अनुदानाची गरज लागणार नाही, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!