लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! मे, जून महिन्याचा हप्ता या दिवशी एकत्र येणार? महत्वाची अपडेट आली समोर..

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
अशातच आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून मे आणि जून २०२५ या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर जमा करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात एकदम ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावर दिले जातात. मात्र, मे महिना संपूनही हप्ता न मिळाल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
मे महिन्याचा (११ वा हप्ता) आणि जून महिन्याचा (१२ वा हप्ता) एकत्र देण्याचे सरकारचे नियोजन असल्याची माहिती मिळाली आहे. म्हणजेच १५०० + १५०० = ३००० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी जमा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हे पैसे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी जमा होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सद्यःस्थितीत सरकारकडून यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.