लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जुलै महिन्याच्या हप्ताची तारीख आली समोर, जाणून घ्या…


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

या योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील कोट्यवधी लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सरकारकडून आलेल्या नव्या अपडेटनुसार हा हप्ता जुलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या ५ तारखेपर्यंत खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, ही योजना सुरू झाल्यानंतर प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला १५०० रुपये अनुदान स्वरूपात दिले जाते. यावर्षी जून महिन्यापर्यंत रक्कम वेळेवर मिळाली होती. मात्र, जुलै महिन्याच्या मदतीचा लाभ अद्याप आलेला नाही. यामुळे अनेक महिलांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती. सध्या राज्यात २ कोटी ३४ लाख महिला लाभार्थी आहेत. २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये या योजनेतून मिळतात. सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, जुलै महिन्याचा हप्ता याच महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा केला जाईल.

राज्यात आगामी महापालिका, जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकांची तयारी सुरू आहे. त्यामुळे सध्या ही योजना सर्व महिलांपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. सरकारने निवडणुका होईपर्यंत योजनेतील छाननी प्रक्रियाही स्थगित केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!