लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचा हप्त्या ‘या’ दिवशी होणार जमा, महत्वाची अपडेट आली समोर..

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

या योजने संदर्भात एक मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक आधार देणारी ही योजना सुरू झाल्यापासून महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी मोठा आधार ठरली आहे.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचा थेट आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असून, त्यासाठी राज्य सरकारकडून तब्बल ४१० कोटी रुपयांची मोठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार असल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे.

दरम्यान, योजनेच्या पुढील हप्त्यांसाठी सरकारने एक नवी अट लागू केली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे सर्व लाभार्थ्यांसाठी आता बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक महिलांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांचा पुढील हप्ता थांबवला जाईल. त्यामुळे सर्व महिलांनी शक्य तितक्या लवकर आपल्या नजीकच्या नागरिक सेवा केंद्रात किंवा ऑनलाईन पोर्टलवरून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांना आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती आवश्यक असेल. ही प्रक्रिया अतिशय सोपी असून काही मिनिटांत पूर्ण करता येते. सरकारने महिलांना सणासुदीच्या काळात दिलासा देण्यासाठी हा हप्ता वेळेवर देण्याचा निर्णय घेतला आहे. माझी लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत असून, या योजनेमुळे त्यांच्या स्वावलंबनाचा मार्ग सुकर झाला आहे.
