दहावीत शिकणारी मुलगी गरोदर! अचानक पोटात दुखू लागलं, आईने रुग्णालयात नेलं अन्…; धक्कादायक प्रकार झाला उघड


मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे येथील एका कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी दहावीमध्ये शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाने वर्गातल्याच मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबत घटना उघडकीस आल्यावर मोठी खळबळ उडाली.

पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड आला. यामुळे पीडितेच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. याबाबत माहिती अशी की, मुलगी दहावीत शिकत होती. तिच्या वर्गात एक मुलगा होता. त्यांची मैत्री झाली. याचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर मुलाने तिला आपल्या दुसऱ्या घरात भेटायला बोलावले.

यानंतर तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. दोघांचे प्रेम असल्याने तिने देखील कोणत्या गोष्टीला नकार दिला नाही. यानंतर ते अनेकदा भेटले व त्यांचे लैंगिक संबंध सुरू होते, त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. मात्र मुलीला याबाबत कसली कल्पना नव्हती.

नंतर अचानक मुलीला त्रास होऊ लागला. मुलीच्या पोटात दुखायला सुरूवात झाल्यामुळे आईने तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेलं, तेव्हा मुलगी 4 महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. यामुळे आईला धक्काच बसला. आईने मुलीकडे विचारपूस केली असता वर्गातल्या मित्राने आपल्यासोबत संबंध ठेवण्याचे तिने सांगितले.

यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास करत असून मुलीने सगळा प्रकार सांगितल्यानंतर आईने आपल्या मुलीसह रबाळे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याबाबत मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!