Gautami Patil : गौतमी पाटीलच्या अडचणीत होणार वाढ, अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल, नेमकं घडलं काय?

Gautami Patil अहमदनगर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा डान्स म्हटला की तरूणांची मोठी गर्दी होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवताना बऱ्याचदा पोलिसांची देखील तारांबळ उडते. (Gautami Patil)
गौतमी पाटील हिचा जिथे कार्यक्रम असेल त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर ताण निर्माण होतो. दरम्यान, कोणत्या न् कोणत्या कारणांमुळे चर्चेत असणाऱ्या गौतमी पाटीलसाठी (Gautami Patil)एक वाईट बातमी आहे.
नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गौतमी पाटीलसह चार जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अहमदनगर मधील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम घेतल्याबद्दल गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाईपलाईन रोडवरील मृत्युंजय प्रतिष्ठानने गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, तिच्या अनेक ठिकाणच्या कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये हुल्लडबाजी व गोंधळ होत असल्याने नगरच्या तोफखाना पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही तिचा कार्यक्रम झाल्याने आता पोलीस याबाबत काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.