सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर एन्ट्री; फॉलोअर्सच्या शर्यतीत भाजप-काँग्रेसलाही टाकलं मागे..


नवी दिल्ली : देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. बेरोजगार तरुणांच्या संदर्भातील कथित वक्तव्यानंतर संतप्त तरुणांकडून ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाचा अनोखा डिजिटल आंदोलनात्मक गट तयार करण्यात आला असून, काहीच दिवसांत या पेजला लाखो-कोट्यवधी फॉलोअर्स मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना महाराष्ट्रातील अभिजीत दीपके या तरुणाने केल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर या पेजला प्रचंड प्रतिसाद मिळत असून इन्स्टाग्रामवर तब्बल 10.5 मिलियन तर एक्स (ट्विटर) वर लाखोंच्या घरात फॉलोअर्स पोहोचल्याचा दावा केला जात आहे.

या पेजचं घोषवाक्य “धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी आणि आळशी” असं ठेवण्यात आलं असून, तरुणांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. बेरोजगारी, ऑनलाईन जगण्याची सवय आणि तरुणांच्या भावनिक प्रतिक्रियांना व्यंगात्मक पद्धतीने मांडत या पेजने सोशल मीडियावर वेगळीच हवा निर्माण केली आहे.

दरम्यान, एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी तरुणांची तुलना “झेट कॉकरोच”शी केल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, वाढता वाद पाहता सरन्यायाधीशांनी आपण असे वक्तव्य केले नसल्याचं स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे.

तरीही या वादातून निर्माण झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ला तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही दिवसांतच या पेजने सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवली असून, पुढे हा डिजिटल ट्रेंड कोणतं रूप घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!