मोठी बातमी! पहिलं बोगस कुणबी प्रमाणपत्र उघडकीस; नगरसेवक पद धोक्यात


दौंड : ओबीसी आरक्षणावर निवडून आलेल्या नगरसेवक रोहित पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हा जात पडताळणी समितीने त्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांच्या नगरसेवक पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पाटील यांच्या प्रमाणपत्रावर सुरुवातीपासूनच आक्षेप घेतला गेला होता. तपासादरम्यान सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याचे समोर आले. रक्ताचे नाते नसलेल्या व्यक्तींचे दाखले आणि विरोधाभासी वंशावळी सादर केल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला.

या प्रकरणाची सुनावणी तब्बल काही तास चालली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर समितीने अंतिम निर्णय देत प्रमाणपत्र अवैध ठरवले. या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणावर निवडून आलेल्या जागेवरील त्यांचे नगरसेवक पद आता धोक्यात आले आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर स्थानिक राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली असून, अशा प्रकारच्या इतर प्रमाणपत्रांचीही सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!