नवी मुंबईत अग्नितांडव! बीटाकेम केमीकल कंपनीत आगीच्या ज्वाळा, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट…

मुंबई : नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्र असलेल्या महापे एमआयडीसी परिसरातील बिटाकेम केमिकल कंपनीला भीषण आग लागली असल्याची माहिती समोर आली. या आगीची तीव्रता इतकी भयानक होती की, आगीच्या ज्वाळा ह्या इमारतीपेक्षा मोठ्या दिसत होत्या.

समोर आलेल्या माहितीनुसार, ‘बिटाकेम’ या केमिकल कंपनीमध्ये केमिकलचा साठा असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. परिसरात मोठमोठे धुराचे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती सध्या नाही.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहाणी नसली तरी कंपनीतील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या केमिकल कंपनीत लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आजूबाजूच्या कंपन्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत