अखेर माध्यमांच्या दबावामुळे उघड झाला दौंड तालुक्यातील अंबिका कला केंद्रातील गोळीबार, गणपत जगताप, बाबासाहेब मांडेकर यांच्यासह एकावर गुन्हा..


दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील बहुचर्चित कला केंद्रावर दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा गोळीबाराची झाल्याची घटना नुकतीच समोर आली. त्यानंतर हे प्रकरण आमदार रोहित पवार यांनीही उचलून धरले आणि आज पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला आहे.

अंबिका कला केंद्रात हा हवेत गोळीबार झाल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी देऊन चार जणांवर गुन्हा दाखल आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकारांशी बोलताना चार जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. माध्यमातून बातमी आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

मात्र तीन कला केंद्र असल्यामुळे या ठिकाणी तपास करण्यास उशीर झाला अशी देखील माहिती गणेश बिरादार यांनी दिली. या घटनेप्रकरणी गणेश जगताप, बाबासाहेब मांडेकर, चंद्रकांत मांडे आणि अन्य एका जणावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती गणेश बिरादार यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

न्यू अंबिका कला केंद्रात हा गोळीबार झाला. २१ जुलै रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला. लावणी कलावंतांची लावणी झाल्यानंतर हा गोळीबार झाला. मात्र त्यानंतर कुठेही चर्चा झाली नव्हती.

एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने या संदर्भातील वृत्त दिले आणि त्यानंतर वेगाने दौंड तालुक्यात ही माहिती पसरली.मात्र यानंतर देखील पोलिसांनी याविषयी मौन बाळगले होते. यासंदर्भात पोलीस सूत्रांना विचारले असता सीसीटीव्ही फुटेज मध्ये देखील काही आढळले नसल्याची माहिती प्राथमिक तपासामध्ये पोलिसांनी दिली होती.

मात्र त्यानंतर आमदार रोहित पवार यांनीही या संदर्भात ट्विट करत या प्रकरणावर सरकारवर टीका केली आणि त्यानंतर माध्यमांमध्ये याची चर्चा सुरू झाली आणि अखेर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!