बुलडाण्यात पुन्हा भीतीचे वातावरण! आता नवीन रोग आला, रुग्णांमध्ये वाढला चिडखोरपणा, भयंकर माहिती आली समोर…


बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. याठिकाणी गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांना अचानक केस गळतीचा त्रास सुरू झाला होता, अनेकांना टक्कल पडले. नंतर याच रुग्णांचे नखे गळण्याचे प्रमाणही वाढले होते. असे असताना आता याच रुग्णांना थकवा व चिडखोरपणा जाणवत असल्यामुळे परिसरात चिंता वाढली आहे.

यामुळे याठिकाणी नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या केस गळती व नख गळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांच्या नमुन्यात सेलेनियमचे प्रमाण वाढले होते अशाच रुग्णांना आता चिडखोरपणा येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिक घाबरले आहेत.

सुरुवातीला आयसीएमआरच्या संशोधन पथकाने केस गळतीचा प्रकार समोर आल्यानंतर या भागाचा दौरा करून अनेक नमुनेही तपासणीसाठी घेतले होते. मात्र त्यांना देखील याबाबत काही समजले नाही. चार महिने उलटूनही अद्याप या पथकाने अहवाल सादर केला नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नखे गळती सुरू झाली व नखे गळतीनंतरही केंद्राच्या विशेष पथकाने या परिसराचा दौरा केला. मात्र काही दिवसांतच या नागरिकांना आता थकवा व चिडखोरपणा जास्त प्रमाणात जाणवू लागल्याने प्रशासनाने या परिसरातील नागरिकांकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!