पुण्यात दुधाच्या टँकरचा भीषण अपघात, चालक गंभीर जखमी; रोडवर हजारो लिटर दुध..

पुणे : शिवाजीनगर राहुल टॉकीज समोरील उड्डाणपूलावर दुधाच्या टँकरचा अपघात झाला आहे. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात वाहन चालक जखमी झाल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या वाहनचालकावर उपचार सुरू आहेत.
तसेच दुधाचा टँकर पलटी झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दूध आणि ऑईल सांडले आहे. सद्यस्थितीत या भागात वाहने चालविताना विषेश काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, दूधाचा टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणावर दूध वाया गेले आहे. तसेच अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांकडून दूधाचा टँकर बाजूला करत वाहतूक पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Views:
[jp_post_view]