शेतकऱ्यांनो काढणीला आलेली पिके काढा, राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पाऊस गारपीट आणि जोरदार वारा, वाचा हवामान खात्याने दिलेली माहिती…

मुंबई : महाराष्ट्रासाठी पुढील 4 ते 5 दिवस हे महत्वाचे असणार आहेत. येत्या चार ते पाच दिवसात राज्यात हलक्या पावसाच्या सरी बसरणार असल्याची माहिती मिळतेय. येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता असून मुंबईत देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना देखील काढणीला आलेली पिके काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पावसाबाबत हवामान विभागाकडून ही मोठी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सोमवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट पडण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका-मध्यम पाऊस आणि वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे हे दिवस महत्वाचे आहेत.
सोमवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटची शक्यता असून मुंबईत हलका, गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या गहू, हरभरा, तसेच द्राक्ष आंबा पिकांचे नुकसान होऊ शकते.