बारामतीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, खासगी सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर…

बारामती : गावातील सावकाराकडून घेतलेल्या कर्जापेक्षाही अधिक रक्कम आणि व्याज दिल्यानंतरही वारंवार लावण्यात येणाऱ्या पैशांच्या तगाद्याला कंटाळून आणि जीवे मारण्याच्या धमकीमुळं पारवडी (ता. बारामती) येथील शेतकरी धनेश गोसावी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही अत्यंत दुःखद घटना आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. बेकायदा सावकारच्या जाचामुळं ‘बारामती’ मधील शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत असेल तर हे धक्कादायक आहे. या घटनेने सगळे हादरले आहेत.
यावरुन राज्यात इतरत्र खासगी सावकार शेतकऱ्यांना कसा त्रास देत असतील, याची कल्पनाच केलेली बरी. त्यामुळं सरकारने खासगी सावकारीवर कठोरपणे चाप लावावा आणि शेतकऱ्यांना सहज कर्ज कसं मिळेल, याबाबत सक्त सूचनाही बँकांना द्याव्यात आणि लागू करुन घ्याव्यात.

दरम्यान, केवळ बैठका आणि निर्णय घेऊन उपयोग नाही तर अंमलबजावणीही महत्त्वाची आहे. अन्यथा आज बारामतीपर्यंत आलेलं आत्महत्येचं लोण उदया मंत्र्यांच्या दारापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही, याबाबत चौकशीची मागणी केली जात आहे.

याबाबत पोलीस प्रशासनाने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. बारामतीपर्यंत आलेलं आत्महत्येचं लोण उदया मंत्र्यांच्या दारापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही, याबाबत चौकशीची मागणी केली जात आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.