सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ!! माजी सभापती रामराजे निंबाळकर यांना समन्स, नेमकं प्रकरण काय?


फलटण : सातारा जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधातील खंडणी व बदनामी प्रकरणात तपासाच्या धागेदोऱ्या माजी विधान परिषद सभापती आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यापर्यंत पोहोचले आहेत. यामुळे वडूज पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहेत.

यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
त्यांना शनिवारी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रकरणाचा उगम एका महिलेच्या आरोपांपासून झाला असून, तिच्या म्हणण्यानुसार जयकुमार गोरे यांनी २०१६ पासून व्यक्तिगत आकस ठेवून त्रास दिला, तसेच अश्लील फोटो व्हॉट्सॲपवर पाठवले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रकरण तापले होते.

याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यामध्ये आता रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव तपासात पुढे आल्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनले आहे. यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी राजराजे यांच्या भावाच्या घरी ईडीने छापा टाकला होता.

दरम्यान, आता राजकीय वर्तुळात हे पाऊल रामराजेंना मोठा धक्का मानले जात आहे. पुढील तपासात आणखी कोणती नावे पुढे येतात, याकडे राज्याचे राजकारण लक्ष ठेवून आहे. या प्रकरणात पत्रकार तुषार खरात, संबंधित महिला आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली होती. तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!