मृत्यूच्या दिवशीही वैष्णवीला….!!! पोलिसांकडून धक्कादायक माहिती आली समोर..

पुणे : जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या अंगावर एकूण २९ जखमा आढळल्या आहे. त्यातील १५ जखमा या मृत्यूपूर्वी चोवीस तासांच्या आत झाल्या आहेत.

त्यामुळे मृत्यू झालेल्या दिवशीही वैष्णवी यांना मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदन अहवालातून ही माहिती मिळाली होती. पोलिसांनी ही माहिती न्यायालयात दिली. वैष्णवीचा पती, सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. या सर्वांची पोलीस कोठडी २८ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
वैष्णवी हगवणेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येच्या दिवसापर्यंत हगवणे कुटुंबियांकडून तिचा छळ करण्यात आला आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीला हगवणे कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आली आहे.

वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे एकूण २९ व्रण आहेत, त्यातील ५ ते ६ व्रण ताजे असल्याचे उघड झाले आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा हगवणे कुटुंबियांकडून छळ झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे.

दरम्यान, तसेच वैष्णवी हगवणेच्या अंगावर असलेले व्रण म्हणजेच तिला ज्या हत्याराने मारहाण केली त्या हत्यारांचा अद्याप तपास लागलेला नाही. ते हत्यार नेमके ठेवले कुठे आहेत? याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. यासाठीही पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली.
यावर न्यायालयाने पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा या तिघांना २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची पोलीस कोठडी सुद्धा २८ तारखेपर्यंत आहे.