Elon Musk भारतात गाड्या विकणार, पण ‘टेस्ला’ देशात बनवणार नाही एकही कार, उत्पादनाला नकार..


नवी दिल्ली : एलोन मस्क यांच्या टेस्लाने भारतात आपली वाहने विकण्यासाठी तयारी सुरू केली असली तरी कंपनी येथे उत्पादन केंद्र स्थापन करणार नाही. केंद्रीय उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे की, टेस्ला भारतात केवळ विक्रीसाठी उपस्थित राहणार असून, उत्पादन प्रक्रियेस दूर ठेवण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे स्थानिक रोजगार निर्मितीची संधी कमी होण्याची शक्यता आहे. टेस्ला कंपनीने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (BKC) ४००० चौरस फूट आकाराचे पहिले शोरूम उघडण्याची योजना आखली आहे.

यासाठी दरमहा सुमारे ३५ लाख रुपये भाडे कंपनीकडून दिले जाणार आहे. या शोरूममधून टेस्लाच्या विविध मॉडेल्सची विक्री करण्यात येणार आहे. मात्र, उत्पादन नसल्यामुळे भारतीय वापरकर्त्यांसाठी किमती तुलनात्मकरीत्या जास्त असतील.

एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले की, टेस्लाच्या विपरीत, ह्युंदाई, मर्सिडीज-बेंझ, स्कोडा आणि किया सारख्या कंपन्यांनी भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यास उत्सुकता दाखवली आहे. हे ब्रँड ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना देत असून, त्यांच्यामुळे स्थानिक रोजगार संधी आणि तंत्रज्ञानाचा प्रसार वाढेल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, अमेरिकेत टेस्लाच्या सर्वात परवडणाऱ्या कारची किंमत सुमारे $४२,४९० म्हणजेच सुमारे ३७ लाख रुपये आहे. ही किंमत भारतीय बाजारात अनेकांसाठी आवाक्याबाहेर असू शकते. त्यामुळे ही वाहने किती लोकप्रिय ठरतील, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. टेस्लाला भारतात यशस्वी व्हायचे असल्यास, स्थानिक गरजांनुसार योजनांमध्ये बदल करावा लागेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!