सर्वात स्वस्त दरात वीज अन् दुष्काळही नाहीसा करणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला विकासाचा रोडमॅप, जाणून घ्या…

मुंबई : विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकास रोडमॅप सांगितला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सरकारच्या आगामी काळातील महत्त्वाच्या योजना सांगताना विरोधकांना चिमटा देखील काढला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
१५ एप्रिलला १०० दिवस पूर्ण होत आहेत. त्यानंतर मंत्र्यांच्या कामाचे मूल्यमापन करणार आहे. ज्यांनी चांगले काम केले नसेल त्यांना निगेटिव्ह लिस्ट मध्ये टाकले जाईल. ज्यांनी चांगले काम केले त्यांचा सत्कार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निवडणुकीत मिळालेला जनादेश हा राज्याच्या विकासासाठी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे..
हे सरकार समन्वयाने चालणार सरकार आम्ही तिघेही निर्णय घेतो
कापूस खरेदीसाठी अधिक केंद्र लागली तरी आपण देणार आहोत
हे सगळे सोयाबीन उत्पादक राज्य पाहिले. तरीही २ लाख मेट्रीक टन अधिक खरेदी आपण केली आहे. आजपर्यंतचा खरेदी रेकॉर्ड आपण मोडला आहे. याआधी सर्वाधिक खरेदी ही २०२६-१७ साली केली होती. काहींची खरेदी राहिली आहे. त्यासाठी केंद्राला मुदतवाढ मागितली आहे.
सरकारी गोदामे भरली असल्याने खाजगी गोदाम घेतली आहेत. ५० हजार क्विंटल वर कापूस असेल तिथे नवीन केंद्र देण्याची सरकारची तयारी आहे
महाराष्ट्राला कायमस्वरुपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे
सात जिल्ह्यांतील 10 लाख एकर जमिनीला फायदा होईल. ४२६ किमीचे नवीन कालवा तयार करत आहे
प्रकल्प अहवाल तयार करून प्रत्यक्ष कामास दोन वर्ष काम सुरु करण्यासाठी लागतील
६ ते ८ वर्षांच्या काम पूर्ण होईल. संपूर्ण विदर्भ दुष्काळ मुक्त दिसेल.
मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी आपण निविदा काढली आहे
जायकवाडी वरील बाजूस धरणे बांधली त्यामुळे तूट निर्माण झाली. त्यामुळे वाद निर्माण होतात, ते बंद होतील. नाशिक, नगर, संभाजीनगर हे वाद मिटतील. पिण्यासाठी मराठवाड्यात पाणी उपलब्ध होईल.
संभाजीनगर व जालना हे नवीन औद्योगिक क्लस्टर निर्माण होतेय त्याला या पाण्याचा फायदा होईल
बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केल्यानंतर 45 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय
16 हजार मेगावॅट वीज सर्वाधिक कृषीला देणार महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे
डिसेंबर 2026 पर्यंत सर्व वीज ही शेतकरी यांना सोलरच्या माध्यमातुन दिली जाईल
शेतकऱ्यांना दिवसा 365 दिवस विज मिळणार आहे
कोणाला ही रात्री पाणी पडण्याची गरज नाही
२०२३० पर्यंत ५२ टक्के वीज ही अपारंपारिक ऊर्जेतून असणार आहे
कोयना नदीतून वाहून जाणारे पाणी कोकणात कसे वापरता येईल, याचा अभ्यास सुरु आहे
सर्व शेतकऱ्यांना आपण सोलारच्या माध्यमातून वीज मिळेल. २०२७ पासून आम्हाला ही सबसिडी लागणार नाही. शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज मिळणार आहे
कार्बन उत्सर्जनात २५ टक्के घट ही एकट्या या योजनेमुळे होणार आहे. हाती घेतलेले प्रकल्प २०२३० सालापर्यंत पूर्ण होतील.
मागेल त्याला सौरकृषी पंप योजना सुरू केली. एका वर्षात पावणे तीन लाख सौर कृषी पंप दिले.
या पंपापमुळे १४ लाख एकर जमिनीला सिंचन क्षमता प्राप्त झाली. १ लाख ३० हजार घरगुती ग्राहकांनी रुफटॉप सोलर लावले.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या १ लाईक २० हजार घरांमध्ये योजनेत सोलर देणार आहोत. त्यामुळे त्यांना वीजेचे बिल येणार नाही.
घरगुती ग्राहकांच्या ७० टक्के ग्राहक हे ० ते १०० युनिट वाद वापरतात. त्यांना सोलार लावून पंतप्रधान योजनेतून अर्थात दीड कोटी ग्राहक हे वीज बिलातून मुक्त होतील.