होळीच्या दिवशी भांग असलेली ठंडाई घेतलीय?, मग नशा कमी करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय जाणून घ्या..


Holi 2025 : होळी हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो, या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना रंग लावतो आणि घरांमध्ये विविध स्वादिष्ट आणि गोड जेवण बनवले जाते. ज्यामुळे या दिवसाची मजा आणखी वाढते. होळीच्या दिवशी बरेच लोक भांगमध्ये थंडाई मिसळून पितात.

भांगेची नशा अनेक काळ टिकते. तुम्ही भांगेचं सेवन सुरु केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला लक्षात येत नाही. पण, हळू-हळू त्याची नशा वाढू लागते. त्यानंतर ती व्यक्ती एका वेगळ्याच जगात पोहोचते, असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही.

दरम्यान, भांग घेतल्यानंतर अनेकांना हँगओव्हर होतो. तो अनेक काळ टिकतो. ही नशा उतरण्यासाठी मोठा वेळ लागतो. या हँगओव्हरमध्ये लोकांना उल्टी, डोकेदुखी, अशक्तपणा यासारखा त्रास होतो. तुम्ही भांग घेतली असेल आणि तुम्हाला नशेचा हँगओव्हर कमी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. त्याच्या मदतीनं तुम्ही नशा लवकर कमी करु शकता.

नारळ पाणी..

आपण एखाद्या मादक पदार्थाचे सेवन करतो त्यावेळी शरीर डिहायड्रेट होते. त्यावेळी स्वत:ला हायड्रेट ठेवा त्यामुळे नशा कमी होण्यास मदत होते. नारळ पाणी घेतल्यानं त्यामधील मिनिरल्स आणि इलेक्ट्रोलाईट्स शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.

आले..

आल्याचं सेवन देखील नशा कमी करण्यासाठी उपयोगी ठरु शकते. त्यासाठी आल्याचा एक तुकडा तोंडात टाका आणि चघळा. तुम्ही थेट आलं खाऊ शकत नसाल तर मध, लिंबू किंवा कोमट पाण्यात आल्याचा रस मिसळून त्याचं सेवन करु शकता.

लिंबू आणि आंबट फळ..

लिंबू हे आंबट असते. नशा कमी करण्यासाठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या घरगुती उपायांमध्ये याचा समावेश आहे. त्याचबरोबर तुम्ही संत्री, मोसंबीसारख्या आंबट फळांची देखील मदत घेऊ शकतात. त्यामधील एंटीऑक्सीडेंट नशा कमी करण्यास मदत करतात. नशा उतरवण्याठी अर्ध्या लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून त्याचं सेवन करा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!