धनंजय मुंडे यांनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला, मुंडेंवरील आरोपाने राजकारणात एकच खळबळ….

बीड : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. करूणा मुंडे यांनी धक्कादायक विधान केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणीवर बलात्कार केल्याचा दावा करूणा मुंडे यांनी केला असून, या संदर्भातील पुरावे आपण मनोज जरांगे पाटील यांच्याकडे घेऊन गेलो होतो, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

करूणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्या मनोज जरांगे पाटील यांना भेटल्या होत्या. मी माझ्याकडे असलेल्या पुराव्यांविषयी त्यांना माहिती दिली, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या दाव्यानुसार, जरांगे पाटलांनी त्यांना समजावून सांगितले.

अजून धनंजय मुंडे यांचे काहीच बाहेर काढलेले नाही, जर सर्व बाहेर काढले तर त्यांचे महाराष्ट्रात राहणे मुश्किल होईल. स्वतःच्या समाजाचे लोक त्यांना चपलेने मारतील, असे जरांगे पाटील म्हटल्याचा दावा करूणा मुंडे यांनी केला.
त्यांनी पुढे आरोप केला की, माझ्या बहिणीवर बलात्कार झाला, माझ्या आईने आत्महत्या केली, त्यासंबंधीची सुसाईड नोट आणि इतर पुरावे माझ्याकडे आहेत. धनंजय मुंडे यांनी ‘गुंडा गँग’ पाळली होती, असा आरोपही त्यांनी केला. माझे धनंजय मुंडेंना चॅलेंज आहे, मी अंगावर येते, मला शिंगावर घे. तुला जीआर कळतो, पण शपथपत्र कळतं का?” असा थेट सवालही त्यांनी मुंडेंना विचारला आहे.
