Devendra Fadnavis : तुमचा आमदार चोवीस तास जनतेसाठी अहोरात्र झटणारा! राहुल कुल यांना वीस हजारांचे मताधिक्य द्या मंत्रीपद मी मिळवून देतो – देवेंद्र फडणवीस


Devendra Fadnavis वरवंड : तुमचा आमदार हा चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहे. त्यांचा शेतीला पाणी मिळावा म्हणून प्रयत्न हा एक अभ्यासू लोकप्रतिनिधी सारखा आहे. त्यांच्या मुळशी , टाटा धरणाचे पाणी वाटप करण्याच्या समितीचा अभ्यास मला स्वतः ला सॅल्यूट करण्यासारखा आहे. त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्व बाबतीत सखोल अभ्यास असून त्यांना वीस हजाराचे मताधिक्य दिल्यास त्यांना मंत्रीपद देण्याचा माझा शब्द असेल असा जाहीर शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

वरवंड (ता.दौंड) येथे भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांच्या सांगता सभेच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. या सभेत ते बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमचा सर्व सामान्य जनतेचा नेता हा जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहे. २४ तास राहुल कुल यांच्या मध्ये जनतेची सेवा करण्याचे काम आहे. राहुल कुल यांनी शेतीला पाणी मिळून देण्यासाठी बंदिस्त पाईप लाईनद्वारे पाणी बचतीसाठी प्रयत्न करून शेतीला ३ टीएमसी पाणी मिळविले आहे.

एवढेच नाही तर त्यांनी शेतीला पाणी अधिक मिळावे म्हणून मुळशी व टाटा धरणाचे पाणी खडकवासला प्रकल्पात वळावे म्हणून अभ्यासू काम केले आहे. त्यांच्या सातत्याने पाण्याचा मागणीसाठी मी त्यांना समिती देऊन या समितीने या ठिकाणचे पाणी या भागाला आणण्याची योजना मांडली आहे. भविष्यात या योजनेवर काम चालू असून त्यांच्या अभ्यासूपणाला माझा सॅल्यूट आहे. तालुक्यात केमिकल विरहित एम आय डी सी व शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे असे ते म्हणाले. Devendra Fadnavis

राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने लाडकी बहीण योजना बंद करावी म्हणून न्यायालयात गेले. मात्र न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल देत त्याचा नाकावर टिच्चून आज आम्ही राज्यातील लाडक्या बहिणींना अडीच हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. पुढील कालावधीत शेतकऱ्याची कर्ज माफी, शून्य टक्के वीज बिल करण्यात येणार आहे.

अडचणीत असलेला भीमा पाटस कारखाना आ.कुल यांनी संयमाने बाहेर काढला असून त्याला निराणी ग्रुपचे मोठे योगदान आहे. यापुढील काळात दौंड तालुक्यात पुढील काळात राज्यातील सर्वात मोठा साखर कारखाना हा भीमा सहकारी साखर कारखाना असेल असे फडणवीस म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!