Devendra Fadnavis : मोठी बातमी! पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा…


Devendra Fadnavis : पुणे विमानतळाला जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज देवेंद्र फडणवीस हे पुणे पालखी मार्ग भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते.

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यासंबंधी सरकारला प्रस्ताव दिला होता, तो आम्ही स्वीकारला आहे, येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळेल अशी माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

आपण नवीन विमानतळ करतोय त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचं आहे. पण जे पुण्याचं विमानतळ आहे, जे नव्या पद्धतीने केलं आहे, त्याचं नामकरण जगदगुरू तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावे, अशी चांगली संकल्पना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मांडली. आम्ही त्यावर तात्काळ काम सुरू केले आहे. येत्या कॅबिनेटला आम्ही तो प्रस्ताव मांडून मंजूर करून घेणार आहोत. Devendra Fadnavis

तसेच केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवणार आहोत. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि नितीन गडकरी यांची असेल. आपण जगदगुरू तुकाराम महाराजांचं नाव विमानतळाला दिलं तर त्याचा सर्वांनाच आनंद होईल, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!