Devendra Fadnavis : बारामतीत इतिहास घडेल, सुनबाई दिल्लीत जाणार म्हणजे जाणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एल्गार…

Devendra Fadnavis : बारामती लोकसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पवार घराण्यातील दोघांमध्ये दुरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात ही लढत आहे. याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा उमेदवारीसाठी अर्ज भरताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला कोणी थांबवू शकत नाही. सुनेत्रा वहिनींनादेखील कोणी थांबवू शकत नाही.
बारामतीत इतिहास घडणार आहे. आपल्या सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे. कांचन कूल पासून ते नवनाथ पडळकरदेखील आहे. त्यामुळे आता फक्त बारामतीमध्ये मतदारांना मतदान केंद्रावर आणायचं आहे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवारांनी मागील २५ वर्ष बारामतीचा विकास केला. त्यासाठी भरपूर मेहनत घेतली. आज बारामतीचं जे रुप आहे ते अजित पवारांमुळे आहे, हे कोणीही नाकारु शकत नाही. Devendra Fadnavis
ही निवडणूक पवार विरुद्ध पवार किंवा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी ही लढाई नाही आहे. ही लढाई देशाचा नेता निवडण्याची लढाई आहे. देशाचा नेता कोण होईल आणि कोणाच्या हाती देश देऊ, हे ठरवणारी ही निवडणूक आहे.
बारामतीचा खासदार हा मोदींच्या बाजूने उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो, हेच या निवडणुकीत पाहणं महत्वाचं असणार आहे. घड्याळ, धनुष्णबाण किंवा कमळ कोणालाही मत द्या. ते मत नरेंद्र मोदींना जाते आणि दुसरे कोणतेही मत राहुल गांधींना जातं.
त्यामुळे मत कोणाला द्यायचे आहे. हा सर्वस्वी निर्णय बारामतीकरांचा असणार आहे, असंही फडणवीस म्हणाले. विकासाला मत द्यायचे की विनाशाला मत द्यायचं, हा निर्णय आता तुमचा असल्याचंही ते म्हणाले.