Devendra Fadnavis : ४५ वर्ष रखडलेला नार पार प्रकल्प पूर्ण होणार, लाखो एकर जमीन पाण्याखाली येणार, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय…

Devendra Fadnavis : गेल्या अनेक वर्षांपूर्वी पार -तापी- नर्मदा नदी जोड प्रकल्पाला मंजुरी मिळाली. मात्र पुढे काम होत नव्हते. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या नदीजोड प्रकल्पाचा फायदा होणार होता. हा प्रकल्प गुजरात सरकार केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या समन्वयाने पूर्ण करणे अपेक्षित होते.
असे असताना हा प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडला म्हणून नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष पाण्याची टंचाई सहन करावी लागली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. हा नदी जोड प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली. 2019 मध्ये फडणवीस यांनी हा प्रकल्प गुजरात सरकारच्या मदतीने पूर्ण करणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे याबाबत निधीची तरतूद देखील त्यांनी केली. महाराष्ट्र हा प्रकल्प स्वतःच्या ताकदीने पूर्ण करणार असा निर्धार फडणवीस यांनी घेतला. Devendra Fadnavis
या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सात हजार पंधरा कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. या सिंचन प्रकल्प अंतर्गत नार, पार, औरंगा या नद्यांचे अतिरिक्त पाणी कालवे आणि बोगद्यांच्या माध्यमातून गिरणा नदी खोऱ्यात पाणी जाणार आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्याला कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या भागाला तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर तालुक्याला याचा फायदा मिळणार आहे. लाखो एकर शेती यामुळे पाण्याखाली येणार आहे.